जगात जर जगायचे असेल तर स्पर्धेत धावायला शिकले पाहिजे - उत्तम कांबळे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जगात प्रचंड स्पर्धा वाढलेली असून आज प्रत्येक माणूस प्रत्येक सेकंदाला आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
   प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषी भूषण बन्सी पाटील तांबे होते तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेतीचे सल्लागार डॉ.शंकरराव राऊत,संस्थेचे महासंचालक डॉ.सर्जेराव निमसे,सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डॉ.हरिभाऊ आहेर,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.संभाजी नालकर कवी यशवंत पुलाटे आदी प्रमुख उपस्थितीत होते.

उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात शेतकरी व्यथा, अडचणी आणि त्यावर उपाय यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कृषी शाखेतील विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करून उपाय योजना करण्याचे आव्हान केले.यावेळी कृषी भूषण बन्सी पाटील तांबे,डॉ सर्जेराव निमसे,डॉ.शंकरराव राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.ऋषीकेश औताडे,कृषी व्यवसाय व व्यवस्थापन चे प्राचार्य डॉ.सचिन गोंदकर आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोवर्धन खंडागळे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.

सदर कार्यक्रमात तीनही कृषी संलग्नित महाविद्यालयांत क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. शेवटी प्रा.रमेश जाधव यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तीनही महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.