नरेंद्र मोदींच्या नावे असलेल्या योजनेद्वारे आर्थिक मदतीचे आमिष दहा महिलांची पावणेतीन लाखांची फसवणूक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गरजू महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने असलेल्या शासकीय योजनेद्वारे आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवून दहा महिलांची पावनेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेसह तिघा जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगिता लोकेश जाधव (वय ३०, रा. गवळीवाडा, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, १७ डिसेंबर २०१७ रोजी नितू नसिर बेग (रा. बेग पटांगण, नगर) या एका इसमासोबत आमच्या घरी आल्या व त्यांनी शासकीय योजनेद्वारे मदत मिळवून देण्याचे सांगत योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी तिच्या सोबत असलेल्या इसमाने सदर स्किममध्ये गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यामध्ये अडीच हजार रुपये भरल्यास दोन लाख रुपये व्यवसाय अनुदान तसेच पाच हजार रुपये भरल्यास चार लाख रुपये अनुदान मिळेल असे सांगितले. यावेळी इतर महिलांना मिळवून दिलेल्या अनुदानाबाबतची कागदपत्रे तसेच बॅंकेचे पासबूक दाखविले. त्यानुसार सदर महिलेस पाच हजार रुपये दिले.

याबाबत बॉडपेपरवरही लिहून घेण्यात आले. तीन-चार दिवसानंतर सातत्याने २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सदर महिलेस फोनवर पैशाबाबत विचारणा केली. मात्र तिने वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यानुसार जाधव यांनी बेग व दोघा जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. स. ई. जे.एन काळे या करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.