अहमदनगर जिल्ह्यात 18 वर्षांत 623 शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात 2001 पासून फेब्रुवारी 2018 पर्यंत एकूण 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु, त्यातील निकषात बसणाऱ्या 329 शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होत नसल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने जनजागृतीबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्‌या स्वावलंबी बनविण्याचे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जमाफी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आत्महत्येच्या प्रमाणात फारशी घट झालेली नाही. यावर्षी दोन महिन्यात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफीसाठीची आकडेवारी सरकार वारंवार जाहीर करत असले तरी नैराश्‍याने ग्रासलेले शेतकरी आत्महत्येपासून बाजूला जाताना दिसत नाही. 

उर्वरित 286 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र अवैध यादीत टाकण्यात आल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यभर सरकारने जनजागृती मोहीम राबविण्याबरोबरच शेतकरी कसा आर्थिक स्वावलंबी होईल हेच पाहणे गरजेचे आहे.

2003 पासून शेतकरी आत्महत्येत होतेय वाढ
जिल्ह्यात 2003 ला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. पुढे हे प्रमाण वाढत गेले. 2006 मध्ये 41, 2007 मध्ये 28, 2013 मध्ये 27, 2014 मध्ये 49, 2015 मध्ये 118, 2016 मध्ये 144 असे आत्महत्येचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. या आत्महत्येमध्ये छाननी करून राज्य सरकारने 329 शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.