चारा छावणी घोटाळाप्रकरणी फौजदारी कारवाईची मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यात सन २०१२ ते २०१४ मधील दुष्काळी परिस्थितीत सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यात झालेल्या घोटाळा प्रकरणी कलम १८८ नुसार होत असलेली कारवाई योग्य नाही. चारा छावणी घोटाळ्याच्या तक्रारी आपण वेळोवेळी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे चारा छावणी चालक व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते काका पाटील बाजीराव गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्राने केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेला या बाबतचा अर्ज गायके यांनी १९ मार्च रोजी जिल्हा प्रशासनास दिला आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, गृहविभागाचे प्रधान सचिव,पशुसंवर्धनमंत्री आणि विभागीय आयुक्­तांना पाठविल्याचे पत्रात नमूद केले आहे. या पत्रामध्ये गायके यांनी सन २०१२ ते २०१४ मध्ये सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यात दोनशे कोटीच्या पुढे चारा छावणी घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात बोगस पशुधन व कोट्यवधी रुपयांचा ताळमेळ नसणे, तसेच ३६ कोटी ५० लाख रुपयांच्या रकमा गायब असणे, असे अनेक भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करताना याबाबत आपण शासनाला वेळोवेळी कागदपत्रांचे पुरावे सादर करुनही या कागदपत्रांच्या आधारे चारा छावणी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली नाही. आता चारा छावणीचालकांवर १८८ कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ती वस्तुस्थितीला धरुन नाही. चारा छावण्यांवर नियंत्रण व कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तेही प्रथमत: दोषी असल्याचे गायके यांनी म्हटले आहे. तत्कालीन काळात पशुधनाची दाखविलेली संख्या बोगस असून याबाबत लोकशाही दिनात अर्ज करुनही तक्रारीची दखल घेतली नसल्याचे गायके यांनी म्हटले आहे.तालुक्­यातील तहसीलदारांना याप्रकरणी विलंब केल्यामुळे जबाबदार का धरण्यात येऊ अशी विचारणा करण्यात आली. मात्र खुलासा कारवाईची मुदत संपूनही संबंधितांनी अद्याप खुलासा केला नाही असा स्पष्ट आरोप गायके यांनी या पत्रात केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.