नगरमध्ये ३१ मार्चपासून पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांना परदेश वारी करण्यासाठी सर्वप्रथम आवश्यकता असते ती पासपोर्टची. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना यापूर्वी पासपोर्ट मिळवण्यासाठी पुण्याला मुलाखतीसाठी जावे लागायचे. ऑनलाईन अर्ज करून देखिलही नागरिकांना पुण्याच्या पासपोर्ट कार्यालयात एकदा तरी हजेरी लावणे आवश्यक होते. शिवाय या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आल्यावरही त्याचे निराकरण करण्यासाठी परत पुण्यालाच जावे लागत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यासाठी नागरिकांचा वेळ आणि पैसे दोन्हीही खर्च होत होते. यासाठीच खासदार दिलीप गांधी यांनी वेळोवेळी केंद्रीय परराष्ट्र मंत्री ना.सुषमा स्वराज यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. येत्या ३१ मार्चपासून अहमदनगर पासपोर्ट सेवा केंद्र आता सुरु होणार आहे.परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच अहमदनगर ला स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाल्याचे जाहीर केले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानुसार शहरातील मुख्य जनरल पोस्ट ऑफिस येथे पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्यालय उभारणीचे काम सुरु झाले आणि येत्या ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यासाठी विदेश मंत्रालयातील पासपोर्ट विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.अहमदनगर जिल्हा वासियांच्या या अडचणींचा विचार करून जिल्ह्याला स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी देऊन प्रत्यक्षात कार्यालय सुरु केल्याबद्दल खासदार दिलीप गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे जिल्ह्याच्या वतीने आभार मानले आहेत .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.