दोन 'युवराजांच्या' वर्चस्वाच्या नादात पुन्हा रुतलं 'एएमटी'चं चाक,नागरिकांचे हाल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहर बससेवा (एएमटी) पुन्हा बंद झाली आहे. यावेळी बंद पडण्यामागचं कारण दोन युवराजांच्या वर्चस्वाची लढाई असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीपाठोपाठी शिवसेनेने बस संदर्भात थेट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उपप्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांची या तक्रारी चांगल्या मनावर घेत बसवर कारवाई सुरू केली. परिणामी, यशवंत ऑटो संस्थेचे धनंजय गाडे यांनी शहर बससेवा बंद करत असल्याचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठवून दिले. या पत्रानुसार बस सेवा बंद झाली. बस सेवा बंद झाल्याने उपनगरातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय गाडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना शहर बस सेवाचा ठेका मिळाला होता. या काळात ही बससेवा निरंतर सुरू राहिली. परंतु, शिवसेनेची सत्ता आल्यावर महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले आणि बस सेवेला देखील त्याचा फटका बसला. 

आठ दिवसापूर्वी गाडे यांनी ८० लाख रुपयांच्या बिलाचे कारण पुढे करत ते मिळत नसल्याचे कारण दिले आणि बससेवा बंद केली होती. राष्ट्रवादीने तर आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. महापौर सुरेखा कदम आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिष्टाई करत त्यातून मार्ग काढला आणि बससेवा पुन्हा सुरू झाली. 

सेवा पुन्हा सुरू झाली म्हणून, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूने नारळ फोडले. या श्रेयवादाचे नगरमध्ये चांगलेच हासू झाले.शिष्टाई यशस्वी झाल्याचे कारणे देत त्याचे श्रेय शिवसेने घेतले. त्याचा गोडवा कमी होत नाही, तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपप्रादेशिक परिहवन विभागाकडे धाव घेत बसच्या वयोमर्यादा आणि त्याची दुरवस्थेकडे लक्ष वेधले. मनसेची तक्रार काही कमी होत की, काय म्हणून शिवसेनेचे नगरसेवक विक्रम राठोड यांनी यात उडी मारत या बसच्या तपासणीची मागणी केली. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी या दोन्ही तक्रारींची गंभीर दखल घेत बसची तपासणी केली. नेप्ती नाका येथे पाच बसची तपासणी केली. बसची दुरवस्था पाहून हा, तर नगरकरांच्या जीवाशी खेळ असल्याचे या तपासणीत पुढे आले. एकप्रकारे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीत या गाड्या नापास झाल्या.

उपप्रादेशिक विभागाकडून झालेल्या या कारवाईमुळे यशवंत ऑटो संस्थेचे संचालक धनंजय गाडे चांगलेच नाराज झाले आणि बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकीत बिल सुमारे ८० लाख रुपये मिळत नाही तोपर्यंत ही बससेवा बंदच राहिल असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. या निर्धारामुळे शहर बससेवा पुन्हा बंद झाली आहे. 

परिणामी उपनगराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बससेवा बंद झाल्याचा फायदा रिक्षा चालकांनी घेण्यास सुरूवात केली आहे. उपनगराच्या काही भागात रिक्षा जात नाही. तिथे बस जात होती. अशा भागात जाण्यासाठी रिक्षांकडून दुप्पट भाडे मागितले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे 'चाट' बसली आहे. नगरकर यामुळे चांगलेच नाराज झाले आहे.

आता शिष्टाई नको रे बाबा!.
शिवसेनेने शिष्टाईचा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून बससेवा पुन्हा सुरू झाल्याचे श्रेय घेतले होते. शिवसेनेचे नगरसेवक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीने ही बससेवा बंद पडल्याची तक्रार आहे. धनंजय गाडे यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. बससेवा सुरू करण्यासाठी नवीन गाड्या आवश्यक आहे आणि त्यासाठी थकलेल्या बिलासाठी गाडे आग्रही आहेत. यासाठी बराच कालावधी जाईल. दरम्यान, बससेवा बंद राहणार असेच चिन्ह आहे. उपप्रादेशिक परिवहनचा अहवाल पाहिल्यास यशवंत ऑटो संस्थेकडील बस रस्त्यावर धावणे सध्यातरी अवघड असेच दिसते आहे. अशा परिस्थिती शिष्टाई करायची कोणी, असा प्रश्न आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.