तरुणाईला बरोबर घेत राष्ट्रवादीचा वटवृक्ष निर्माण करू : लंघे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- युवाशक्तीला बरोबर घेऊन नेवासे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वटवृक्ष निर्माण करू, असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले. शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन लंघे, तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात श्री लंघे हे बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माजी आमदार पांडुरंग अभंग अध्यक्षस्थानी होते. तुकाराम मिसाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफूरभाई बागवान, जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, बाळासाहेब शिंदे व्यासपीठावर होते. पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत करून सत्कार केला. जयप्रकाश रासने यांनी प्रास्ताविक केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
लंघे म्हणाले, युवा शक्ती राजकारणात चमत्कार करू शकते, म्हणून त्यांना प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. नेवासा हे विचारांबरोबर चालणारे शहर आहे. पोतदार यांच्यासारखे धडाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत असल्याने पक्षाला उज्ज्वल भविष्यकाळ आहे. मारुतराव घुले यांनी गोरगरीब, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांचे कार्य व विचार पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक जिल्हा चिटणीस सचिन कडू, दीपक आगळे, डॉ. शंकरराव शिदे, नवनाथ साळुंके, योगेश रासने, मंगेश निकम आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.