सत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी अशोक जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हा पक्ष कार्यालयात जाधव यांना शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जि.प. सदस्य माधवराव लामखडे, सुजित झावरे, नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी सुरेश गायकवाड, पोपट घुंगार्डे, राजेंद्र गावकरे, दिपक कराळे, सागर वाळुंज, अंकुश काळे, सुनिल गोंडाळ, बापू पवार, रावसाहेब गोंडाळ आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रा.माणिक विधाते म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगार हा मोठा प्रश्‍न समाजापुढे आहे. सत्ताधार्‍यांनी सत्ता मिळवण्यासाठी युवकांना रोजगाराचे स्वप्न दाखविले. शेतकरी, युवक, सर्वसामान्य कामगार, नोकरवर्ग अच्छे दिनाच्या प्रतिक्षेत होरपळले जात आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेतकरी, कामगार व युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. तर पक्षामध्ये येण्यासाठी युवकांची ओढ लागली असून, युवकांना संधी देण्याचे कार्य केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगर तालुक्यात अशोक जाधव यांचे असलेले उत्तम युवकांचे संघटन व सामाजिक प्रश्‍नांवर चालू असलेल्या कार्याची दखल घेत त्यांची नगर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे गहिनीनाथ (दादा) दरेकर म्हणाले. अशोक जाधव यांनी वंचितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी समाजाच्या तळागाळा पर्यंन्त राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य करणार आहे. ग्रामीण भागातील युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.