शेतकऱ्यांनी अच्छे दिनाची अपेक्षा सोडली - माजी आ.शंकरराव गडाख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सरकारची ध्येय-धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची नसून, सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जाणिवपूर्वक बगल दिली जात आहे. हीच पद्धत नेवाशाचे विद्यमान लोकप्रतिनिधी अवलंबत असून, शेतकऱ्यांनी तसेच सर्वसामान्यांनी अच्छे दिनाची अपेक्षा सोडून दिल्याचे प्रतिपादन माजी आ.शंकरराव गडाख यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वांजोळी (ता.नेवासा) येथे ३५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन माजी.आ.गडाख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी कुलसचिव काशिनाथ पागिरे, जि.प.सदस्य सुनील गडाख, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, अनिल अडसुरे, कारभारी जावळे, गट शिक्षणाधिकारी मुंडे, अशोक साळवे, राजेंद्र गुगळे, बाळासाहेब सोनवणे, सरपंच तात्या शिरसाठ, उपसरपंच बद्रीनाथ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.

गडाख म्हणाले, की, तालुक्यात काही भागात विकासकामांबाबत ढुंकूनही न पाहण्याचे धोरण लोकप्रतिनिधी राबवत असून, निवडून आल्यापासून वांजोळीकरांना किती वेळा त्यांनी भेट दिली, हा संशोधनाचा विषय आहे. विकासकामे करण्यासाठी परिश्रम व संघर्ष करावा लागतो. हे काम बद्रीनाथ खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली वांजोळीत सुरु असून. त्यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच वांजोळीचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार असून, प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रास्ताविकात बद्रीनाथ खंडागळे यांनी ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याचे पाणी पाईपलाईन, दलित वस्ती, पथदिवे व रस्ता, स्मशानभूमी, शाळा दुरुस्ती, ग्रामपंचायत फर्निचर, वेश आदी विकासकामे व उद्घाटन करण्यात आल्याचे सांगून पांढरीपूल एमआयडीसीतील रोजगार निर्मितीसाठी गडाख यांना साकडे घातले. पागिरे म्हणाले की, वांजोळीसह परिसरात नवे नेतृत्व उदयाला येत असून, तरुण पिढी गावच्या विकासासाठी पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब आहे. शेती प्रश्नासाठी युवकांनी अभ्यास व संशोधन करणे काळाची गरज असल्याचे म्हटले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.