अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 23 मार्चला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णयाय घेतलाय. यावर केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे 3 पानी पत्र घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
लोकपाल, कृषी मूल्य आयोग आणि शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अण्णांनी केंद्र सरकारला 43 पत्र लिहिले होते. तसंच 23 मार्चपासून दिल्ली उपोषणाला बसणार अशी घोषणा केली होती.

अण्णांनी वारंवार पत्रव्यवहार करून कोणतेही उत्तर मिळत नसल्यामुळे अण्णांना केंद्र सरकारला तीन पानी पत्र पाठवले. त्यानंतर राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी आज अण्णांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले. तसंच अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोनवरूनही चर्चा केली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन गंभीर असून मुख्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत. अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला 43 पानी पत्र लिहिलंय. आता अण्णांची मनधरणी करण्यासाठी गिरीष महाजन राळेगणसिद्धीमध्ये तळ ठोकून आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.