प्लास्टिक पिशवी आढळल्यास ५ हजार रुपये दंड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणला आहे. तथापि, लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने पूर्वीपासूनच गावात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून, काही विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. गावातील कोणताही विक्रेता किंवा आठवडे बाजारात प्लास्टिक पिशवी आढळल्यास ५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय रविवारी ग्रामसभेत घेण्यात आला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पाडव्यानिमित्त हनुमान मंदिरात ग्रामसभा झाली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेस जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, काशिनाथ विखे, भगवंतराव विखे, किसनराव विखे, सुभाषराव विखे उपस्थित होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शालिनी विखे म्हणाल्या, काही गाळेधारक व अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची थकबाकी अजून भरलेली नाही. त्यामुळे सर्व थकबाकीदारांकडून १० टक्के अतिरिक्त रक्कम व्याज व दंड म्हणून वसूल करावी. या सूचनेस ग्रामसभेने मंजुरी दिली. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.