पाथर्डीत मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांच्या दौऱ्याची जय्यत तयारी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पाथर्डीकरांना पहिल्यांदाच अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन अनुभवायला मिळणार आहे. एकलव्य परिवार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एकलव्य शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव, संस्थेचे संस्थापक माजी आमदार माधवराव निऱ्हाळी यांच्या तैलचित्राचे अनावरण, संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा गौरव समारंभ येत्या 25 तारखेला होत आहे. जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे नेते कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

पाथर्डीच्या इतिहासात एवढा भव्य कार्यक्रम यापूर्वी झाला नव्हता. संपूर्ण शहर कार्यक्रममय झाले आहे. 100 बाय 500 फूट असा मुख्य मांडव (शामियाना) असून याशिवाय महत्त्वाच्या व्यक्ती, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, माध्यम केंद्रासाठी स्वतंत्र भव्य शामियाना (कक्ष) उभारण्यात येणार आहे. 

डीएड्‌ कॉलेजच्या आवारात म्हणजे मुख्य कार्यक्रमाच्या समोरच्या बाजूला महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र भोजन कक्ष उभारणी सुरू आहे. एकावेळी 25 हजार व्यक्‍ती जेवण करू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे.बंदोबस्तावरील सर्व पोलिसांना त्यांच्या जागेवर अल्पोपाहार व पिण्याचे पाणी पुरवले जाईल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र असून तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र दालनात तज्ज्ञाचे पथक असून, संपूर्ण मंडप व प्रवेशद्वारावर एलईडी वॉलवर कार्यक्रम पाहता येणार आहे. आव्हाड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर उतरू शकतील असे नियोजन पूर्ण झाले आहे.

एकलव्य परिवार या नावाने संयोजकांची वेगळी ओळख उपस्थितांना मिळणार आहे. याच नावाने आगामी काळात तालुक्‍यात सामाजिक उपक्रमांचे व्यासपीठ सुरू होणार आहे.स्वयंसेवकांचे आतापर्यंत पाच प्रशिक्षण वर्ग (बैठका) झाले असून, तालुक्‍यातील जनतेला भव्य कार्यक्रम व सोहळा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. 

यापूर्वी सुमारे 40 वर्षांपूर्वी पद्मभूषण एस. सी. मोदी यांच्या नेत्रशिबिराच्या भव्य कार्यक्रमात संपूर्ण शहर कार्यक्रममय झाले होते. त्यापेक्षा भव्य प्रमाणात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याने कार्यक्रमाचे आजवरचे सर्व उच्चांक मागे टाकणारा ठरणार आहे. मुख्य संयोजक ऍड. प्रताप ढाकणे गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी झटत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.