अहमदनगर महापालिकेतील कचरापेट्या खरेदीत गैरव्यवहार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर महापालिकेतील घनकचरा विभागातील लोखंडी कचऱ्याच्या पेट्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. या विषयाकडे लक्षवेधी मांडून त्यांनी विधानसभेचेही लक्ष वेधले अाहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महानगर पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत लिटरबिन्स (लोखंडी कचरा पेट्या) खरेदीची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराची लाखो रुपयांची जादा दरांची निविदा मंजूर करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. 

निविदा प्रपत्रातील चुकीच्या तपशीलाचा आधार घेत लघुत्तमदराची निविदा बाद करण्याच्या हालचाली महापालिकेत ठेकेदार, पदाधिकारी व अधिकारी यांच्या सुरू अाहेत. निविदा प्रक्रिया पारदर्शी होऊन निकोप स्पर्धा व्हावी व त्यातून संस्थेचे आर्थिक हित जोपासने हे ई-निविदा कार्यप्रमाणालीचा हेतू आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तथापि शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. त्यामुळे लिटरबिन्स खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडणे, पथदिवे घोटाळ्यातून मनपाची ३४ लाखाची फसवणूक झाली. हे प्रकरण ताजे असताना हा प्रकार समोर आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.