संगमनेरला जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी उभारली गुढी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे या आपल्या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने संगमनेर जिल्ह्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नूतन मराठी वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या निमित्ताने संगमनेर जिल्ह्याची गुढी उभारण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पालकमंत्री राम शिंदे यांनी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करूनच राहणार असे एका कार्यक्रमात ठणकावून सांगितले. तेव्हापासून अनेक वर्षांपासून प्रलंबित पडलेला जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाला पुन्हा एकदा नव्याने तोंड फुटले आहे . पालकमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी ही जिल्हा विभाजनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संगमनेरच तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. सांस्कृतिक, पारंपरिक आर्थिक, सहकार क्षेत्र, मोठी बाजारपेठ असलेला संगमनेरच जिल्हा होण्यासाठी योग्य आहे. आपल्या न्याय मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समितीच्यावतीने शहर बस स्थानकाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून एका छोटेखाणी मंडपात सह्यांची मोहीम चालू केली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या सह्या मोहिमेला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, आजपर्यंत सुमारे ऐंशी हजार सह्या झाल्या आहेत. संगमनेर जिल्हा होण्यासाठी जनतेत जन जागृती निर्माण करून मोठे जन आंदोलन उभारण्यासाठी ही सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. लाखभर जनतेच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.