पारनेर तालुक्यातील शिवसैनिक अस्वस्थ !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जि. प. सदस्य काशीनाथ दाते व नांदुर पठार गावचे सरपंच रविंद्र राजदेव यांच्या राजकिय स्पोटक वक्तव्यांमुळे सध्या पारनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मागील काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील शिवसेना राजकिय बॉम्ब फोडत आहे. त्यामुळे तालुक्यात कट्टर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पारनेरचे आमदार यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पारनेर दौर्‍यावर येऊन गेले. त्या कार्यक्रमात माजी शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके समर्थकांनी पक्षप्रमुखांच्या समक्ष काही गोष्टी झाल्या. तेंव्हापासुनच शिवसेनेत राजकीय कलगी तुरा पहावयास मिळाला. 

याच मुद्यावर शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंकेची पदावरुन हाकलपट्टीची झालेली घोषणा तसेच नवनियुक्त तालुका प्रमुख आमदार औटी समर्थक विकास रोहकले यांची निवड यांमुळे तालुक्यात शिवसेनेचे राजकिय ध्रुवीकरण चांगलेच पहावयास मिळत आहे. 

त्यातच भर पडली ती पारनेर शहरातील चौकात निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त लावलेला प्लेक्स अज्ञात इसमाने फाडून टाकल्याने लंके व औटी यांच्यात राजकिय दरी वाढत गेली. त्यातच भर पडली ती एका सोशल मीडियावर चांगलीच राजकिय वक्तव्य केल्याने शिवसेना तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवसेना जिल्हाउपप्रमुख रामदास भोसले, जि. प. सदस्य काशीनाथ दाते तसेच नांदुर पठारचे सरपंच रविंद्र राजदेव यांच्यातील गटात कामे किती केली? या विषयावरुन सगळे रामायण सध्या तालुक्यात चर्चेचा विषय सोशल मीडिया वर धुमाकुळ घालत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.