'एएमटी' बस भंगारात टाकण्याची नगरसेवक विक्रम राठोड यांची मागणी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहर बससेवा देणारी एएमटी बससेवा नादुरुस्त असून बसची अवस्था बिकट आहे. प्रवाशांना धोका निर्माण झाला असून बस स्क्रॅप कराव्यात अशी मागणी नगरसेवक विक्रम राठोड यांनी उपपरिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहर बससेवा देणाऱ्या यशवंत ऑटो संस्थेमार्फत शहरात प्रवासी देण्यासाठी करार करण्यात आला होता. बसला खिडक्या नाहीत, काचा नाहीत, टायर खराब झालेले आहेत. संबंधित चालकांकडे वाहन परवाने आहेत का? त्यांचे इन्शुरन्स काढलेले आहेत का? आदीची तपासणी केली जात नाही. बस खराब असल्याने रस्त्यात मध्येच बंद पडतात. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अपघात होऊन प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण झाल्यास यशवंत ऑटो ही संस्था भरपाई देणार का? याचीही शाश्वती नाही. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, गाड्यांवर नंबर प्लेट नाहीत, आतील सीट फाटलेले आहेत. अशा बसमधून प्रवास करणेही धोकादायक अाहे. त्यामुळे बस स्कॅप कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.