खून, दरोडे, जबरी चोरीतील दोन सराईत गुन्हेगार ताब्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, जबरी चोरी आदी गंभीर गुन्ह्यातील आरोपी असणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीतील साईमंदिर परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ फेब्रुवारी रोजी शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून योगेश पालवे यांच्या आदेशाने मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील खंडोबा मंदिराजवळ बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता गेले असता त्यांना एक डंपर (नं. एमएच १५, सीके ८४०७) हा विनापरवाना वाळू घेवून जात असताना दिसला. 

हा वाळूचा डंपर पथकातील कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सदरचा डंपर पकडून ताब्यात घेतला. त्यावेळी कोपरगाव येथील सराईत गुन्हेगार किरण माधव हजारे याने नगर जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्याच्या साथीदारांसह चारचाकी गाडीतून येवून त्याने व त्याच्या साथीदारांनी महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून योगेश पालवे यांच्या खिशातील रोख २ हजार ४०० रुपये काढून घेवून सरकारी वाहनाच्या काचा फोडून सरकारी कामात अडथळा करून डंपर पळवून नेला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या घटनेबाबत योगेश पालवे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिलीप पवार यांच्याकडे आला असता किरण हजारे हा त्याच्या साथीदारासह शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानूसार या आरोपीचा शिर्डी परिसरात शोध घेतला असता किरण माधव हजारे (रा.कोपरगाव) हा त्याचा साथीदार सूरज प्रकाश ठाकूर (रा.शिर्डी) याच्यासह साईबाबा मंदिर परिसरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई श्री. पवार यांच्या पथकातील सपोनि. डॉ.शरद गोर्डे, सपोनि कैलास देशमाने, पोसई, सुधीर पाटील, पोसई. राजकुमार हिंगोले, पोहेकॉ. मन्सूर सय्यद, सोन्याबापू नाणेकर, उमेश खेडकर, योगेश गोसावी, पोना. रवींद्र कर्डिले, पोना.मनोज गोसावी, पोना.विजय ठोंबरे, पोना.सचिन आडबल, पोना. दत्ता गव्हाणे, पोना. दीपक शिंदे, पोना. रविकिरण सोनटक्के, पोना.दिगंबर कारखेले, चापोना. बबन बेरड आदींनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.