प्रांताधिकारी वाहनावर हल्ला करणारे दोघे जेरबंद

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विनापरवाना अवैध वाळूने भरलेल्या डंपरचा पाठलाग करणाऱ्या प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या शासकीय वाहनाच्या काचा फोडून महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी तालुक्‍यातील वारी गावात घडला. या प्रकरणी 7-8 जणांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर फरार झालेल्या दोघा सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 32 दिवसांनंतर शुक्रवारी रात्री पावणेएक वाजता साईबाबा मंदिर परिसरात सापळा लावून जेरबंद केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिर्डीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या शासकीय बोलेरो जीपमधून अव्वल कारकून दत्तात्रेय पालवे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक कारवाई करण्यासाठी वारी गावात गेले होते. दरम्यान, गोदावरी नदीपात्रातून वाळू भरून निघालेला डंपर थांबविला असता किरण हजारे, देवा खंडीझोड व इतर 7-8 जणांनी दहशत निर्माण करून पालवे व तलाठी जाधव यांना मारहाण करीत बोलेरोच्या काचा फोडल्या. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या घटनेनंतर फरार झालेले किरण माधव हजारे (रा. कोकमठाण) व सूरज प्रकाश ठाकूर (रा. शिर्डी) हे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर साईबाबा मंदिर परिसरात येणार असल्याची गुप्त खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, कैलास देशमाने, सुधीर पाटील, राजकुमार हिंगोले, हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, सोन्याबापू नाणेकर, रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे, रवी सोनटक्के यांच्या पथकाने सापळा लावून दोघांना जेरबंद केले. आरोपींना तालुका पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी ताब्यात घेतले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.