घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडुन दिड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील रतनवाडीमध्ये घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडुन दिड वर्षाच्या चिमुकलीला प्राण गमवावे लागले.याबाबत माहिती अशी की : रतनवाडीमध्ये किसन दुंदा कोकतरे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बांधकामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी त्यांनी बाजुलाच तीन ते चार फुटाचा खड्डा खोदला. परिस्थिती गरिबीची असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य गंवड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करत होते. दुपारी दीड वाजता बांधकाम सुरू असताना दिड वर्षाची ईश्वरी नावाची मुलगी खेळत असताना पाण्याच्या खड्ड्यात पडली. तिचे आई, वडील, काका हे सर्व गंवड्याच्या हाताखाली काम करत असल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बराच वेळ झाल्यावर तरी ईश्वरी दिसेना म्हणुन आवाज दिला पण चिमुकली ईश्वरी सापडली नाही. म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. काही वेळा नंतर ईश्वरीच्या काकांना ती खड्यात पडल्याने लक्षात आले; मात्र तोपयंर्त उशीर झाला होता. घटना आईला समजताच तिने हंबरला फोडला. एकुलत्या एक ईश्वरीच्या दुदैर्वी मृत्यू झाल्यामुळे दुंदा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असुन गावात शोककळा पसरली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.