आज शिवतीर्थावर मनसेचा ‘पाडवा मेळावा’

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुबईतील शिवतीर्थावर (शिवाजी पार्क मैदान) सालाबादप्रमाणे यंदाही मराठी नववर्षदिनी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्याचबरोबर राज ठाकरे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. मनसेकडून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी सुरु असून मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्सद्वारे तसेच सोशल मीडियातून याची माहिती देण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांत विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत. यामध्ये त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची पहिल्यांदा घेतलेली जाहीर मुलाखत गाजली. त्यांनी पवारांना यावेळी विविध विषयांवर अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. या दरम्यान, आपल्या मनातील खास प्रश्न त्यांनी विचारुन त्यांना बोलत करण्याचा प्रयत्नही केला. राज्यभरातील राजकीय वर्तुळात या मुलाखतीची खूपच चर्चा झाली होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच दोनच दिवसांपूर्वी नाशिकहून पायी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत येऊन धडकला होता. राज ठाकरे यांनी या मार्चाला जाहीर पाठींबा दर्शवला होता. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सायन येथील सौमय्या मैदनात विसाव्यासाठी थांबलेल्या या मोर्चेकरांची स्वतः भेट घेतली होती. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकार सोडवणार नाही, एकदा माझ्या हातात सत्ता देऊन पहा तुमचे प्रश्न सुटतात की नाही, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.