संगमनेर तालुक्यात एकाच रात्री सात दुकाने फोडली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील निमगांव पागा येथे अज्ञात चेारट्यांनी धुमाकूळ घालत मंगळवार दि. १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास सात दुकाने फोडली आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमगांव पागा याठिकाणी भागवत सयाजी कानवडे यांचे समर्थ सुपर शॉपीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे भागवत यांनी आपले दुकान मंगळवारी रात्री बंद करुन घरी निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी समर्थ सुपर शॉपी हे दुकान फोडून दुकानातील गल्ल्यात असणारे ४६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन पोबारा केला. 

त्यानंतर या चोरट्यांनी सोमनाथ कृषी सेवा केंद्र, कालिका माता कृषी सेवा, अमीन मोबाईल शॉपी, घुले मेडिकल, बाबा मेडिकल, साईश्रद्धा किराणा अशी सहा दुकाने चोरट्यांनी टॉमीच्या साह्याने शटर उटकटून चोरटयांनी आत प्रवेश केला व दुकानातील रोख रक्कम, व चिल्लर व किरकोळ सामान चेारुन पोबारा केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तीन महिन्यापुर्वी अशाच पद्धतीने चोरट्यांनी धुमाकूळ घालत विघ्नहर्ता किराणा शॉपीचे पत्रे उचकटून दुकानातील मोठा ऐवज चोरुन चोरटयांनी पोबारा केला होता. अद्यापही या चोरीचा तपास लागला नाही. पुन्हा अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे सात दुकाने फोडून मोठा ऐवज चोरुन पोबारा केला आहे.

याप्रकरणी भागवत कानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळू घोडे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.