48 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे कालव्यांसाठी 159 कोटींची तरतूद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 48 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांसाठी 158 कोटी 83 लाख 50 हजार रुपये, तर वांबोरी चारीसाठी 2 कोटी 57 लाख रुपये आर्थिक तरतूद झाल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीचे नेते नानासाहेब जवरे यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्ह्यातील या दोन अर्धवट प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागाने 161 कोटी 58 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे काम राजकीय अनास्थेमुळे 48 वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पाला निधी मिळविण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने केंद्रीय जलआयोगाच्या 16 मान्यता नुकत्याच पूर्ण करून दिल्या.

त्यासाठी कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2016 साली जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीमुळे राज्याला सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्त विभागाची हमी द्यावी लागली. आता केंद्रीय जलआयोगाकडून आर्थिक निधीसंदर्भात कधीही घोषणा होऊ शकते.

केंद्र सरकारने निधी देण्याबाबत तसे प्रतिज्ञापत्र औरंगाबाद खंडपीठात मार्च 2017 मध्ये दाखल केले आहे. राज्य सरकारचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. त्यात राज्याच्या अर्धवट प्रकल्पांच्या सिंचनासाठी 8 हजार 233 कोटी 12 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प व वांबोरी चारीचा त्यात समावेश आहे. त्यासाठी 161 कोटी 58 लाख 50 हजार रुपयांची तरतूद केली असल्याचे अधिकृत कागदपत्रावरून स्पष्ट झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या तरतुदीबाबत निळवंडे कालवा कृती समितीने समाधान व्यक्‍त केले. हा सर्व निधी अकोले तालुक्‍यातील डोंगराळ भागातील 1 ते 18 कि.मी.च्या मुख्य कालव्यांसाठी प्राधान्याने खर्च करण्याची मागणी कृती समितीची आहे. यासाठीचे भूसंपादन यापूर्वीच झालेले आहे. कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे, रूपेंद्र काले, संजय गुंजाळ, नानासाहेब गाढवे, रमेश दिघे, अभियंता हरिश चकोर, विठ्ठल देशमुख, एस. व्ही. उऱ्हे यांनी आर्थिक तरतुदीबाबत शासनाचे आभार मानले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.