शेवगावमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भगूर (ता. शेवगाव) येथील शिवारामध्ये बुधवारी शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील एका उसाच्या शेतामध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भगूर येथील शिवारामध्ये शेवगाव- पाथर्डी रस्त्यानजीक अशोक एकनाथ मुरदारे यांच्या उसाच्या शेतामध्ये ऊसतोडणी कामगार ऊस तोडत असताना त्यांना अंदाजे 30 – 35 वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या इसमाची उंची साडेपाच फूट असून रंग काळा-सावळा आहे. अंगात काळा टी-शर्ट, फिकट निळसर रंगाची पॅन्ट घातलेली आहे. दुपारी 2 च्या सुमारास शेतामध्ये ऊसतोडणी करत असताना कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवली. याबाबत पुढील तपास पो. कॉ. राजेंद्र नागरगोजे व राजेंद्र केदार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.