ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वांबोरीत दोन गटांत हाणामारी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वांबोरी येथे दोन गटांत किरकोळ कारणावरुन हाणामारीची घटना घडली. दोन्ही गटाकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटांवर प्रतिबंधक कारवाई केली असून वांबोरी गावात सध्या दंगलसदृश वातावरण असून पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वांबोरी येथे दोन आडवड्यापूर्वी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक मोठ्या चुरशीत झाली. यामध्ये सत्ताधारी गटाला पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीतील पराभवाचे शल्य मनात धरूनच या वादाला तोंड फुटल्याचे वांबोरी परिसरात चर्चा होत आहे.

वांबोरी परिसरातील एका युवक नेत्याच्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या तरुणांकडून गावात काल रात्री मोटरसायकलचा निवडून आलेल्या उमेदवाराच्या नात्यातील एकाला धक्का लागला. हा वाद उफळून आल्याने व धक्का मारल्याचा राग आल्याने संबंधिताने नातेवाईकांना बरोबर घेत सरळ युवक नेत्याचा स्वीय सहाय्यक रहात असलेल्या ठिकाणी जावून धुमाकूळ घातला.

यावेळी या परिसरात बघता बघता मोठी गर्दी जमल्याने दोन गटांत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी नगर, श्रीरामपूर, राहुरीसह आदी ठिकाणच्या पोलीस पथकास पाचारण केले. या ठिकाणी पोलीस व्हॅन दाखल झाल्या.

यावेळी वाद झालेल्या दोघांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेवून राहुरी पोलीस ठाण्यात आणून कारवाई केल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात आली. रात्रभर वांबोरी गावात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने वेळीच घटनेची दखल घेतल्याने पुढील दुर्घटना टळल्याची परिसरात चर्चा होत आहे.

दोन गटांत झालेल्या वादाने वांबोरी परिसर हादरून गेला असून रात्रभर राहुरी पोलीस ठाणे परिसरात दोन्ही गावातील नेतेमंडळी ठाण मांडून होते. दोन्ही गटातील वाद करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करुन काही अटी घालून सकाळी त्यांना सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.