शेतमाल कोसळल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कांद्यापाठोपाठ पालेभाज्यांसह सर्वच शेतमालाचे दर कोसळल्याने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे.शेतातील उभ्या असलेल्या पिकावर त्याने वर्षेभरातील आपले आर्थिक नियोजन केले होते. मात्र सध्या बाजारात सर्वच शेतमालाचे भाव प्रचंड कोसळले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात विक्रीस आनलेल्या शेतमाल विक्रीतून उत्पादनासाठी झालेला खर्चही निघने अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारणच बिघडले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सध्या बाजारातील शेतमालास मिळणारे भाव पाहता शेतकऱ्यांची अवस्था भीक नको पण कुत्रं आवरं अशीच काहीशी झाली आहे. या हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले वार्षीक गणित करून शेतमाल उत्पादन केला. परंतु आज बाजारातील अवस्था पाहता शेतकऱ्यांना त्यांना हाच शेतमाल उत्पादीत करण्यासाठी खर्च झालेली रक्कमही हातात पडत नाही.

याउलट त्याला शेतातून शेतमाल बाजारात आणण्यासाठी आलेला खर्चही तर सोडाच परंतु पदरमोड करावी लागत आहे. कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केल्यानंतर आता भाजीपालाही कोसळला आहे.परिणामी शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.फेब्रुवारी महिन्यात दहा ते १५ रुपयांना मिळणाऱ्या पालेभाजीची एक जुडी आज केवळ तीन ते पाच रूपयांना मिळत आहे. 

कोथिंबीर दोन रूपये जुडी, पालक तीन ते पाच रूपये, शेपू तीन ते पाच रूपये, मुळे पाच रूपये, वाटाणा दहा रूपये पावशेर, वांगी दहा रूपये किलो, टोमॅटो दहा रूपये किलो, बटाटे दहा रूपये, दोडके,घोसाळे, कारले दहा रूपये, कांदा आठ ते दहा रुपये किलो. याप्रमाणे सर्वच शेतमालाचे दर कोसळल्याने शेतकरी आता पुरता वैतागला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.