भाजप सरकार सत्तेत परतणार नाही - आमदार बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  गाडीत बसलेल्यांना मागे उडत असलेली धूळ कळत नाही.या सरकारचे तसेच झाले आहे. आपल्या विरुध्द जनतेच्या मनातील रोष न कळलेले हे सरकार 2019 मध्ये सत्तेत परतणार नाही.असा इशारा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सरकारला दिला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विधानसभेतील अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करतांना मा.महसूलमंत्री आमदार थोरात यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातच रस असल्याने चंद्रकांत पाटील यांचे महसूल खात्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीका केली. 

यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, सातबारा उतारा ऑनलाईन देण्याची योजना ठप्प असून अनेक कुटुंबातील कुटुंबात संपत्तीचे हस्तांतरण झाले तर त्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही.असा निर्णय या सरकारने जाहीर केला.त्याची भरपूर प्रसिध्दीदेखील मिळवून घेतली पण प्रत्यक्षात त्या बाबतचा आदेश आजूनही निघालेला नाही.

एखादा निर्णय यशस्वी व्हायचा असेल तर मंत्री मुख्यमंत्र्यांची त्यासाठी बांधिलकी असावी लागते.समृध्दी महामार्ग धावतोय पण सातबारा मात्र धावत नाही ते यामुळेच.कृषी मंत्र्यांचे केवळ कृषी विभागावर नव्हे तर सहकार, पणन, मदत पुनर्वसन अशा विविध खात्यांत जरब असली पाहिजे पण कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे तसे दिसत नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
असे सांगतानाच आमदार थोरात यांनी आधी होत त्या प्रमाणे पीक आढावा बैठकी मुख्यमंत्र्यांनी स्वत:घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.तसेच सरकार फक्त जाहिरात बाजी करत असून कोणतेही विकासाचे काम करत नसल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.