ज्ञानेश्वर कारखान्यावरील ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे अक्काबाई राजेश राठोड (२८) या ऊसतोड मजुराचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर कारखान्यासाठी ऊस पुरवणाऱ्या अर्जुन पनालाल राठोड मुकादम असलेल्या टोळीतील ही महिला होती. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्या वरखेडी तांडा (ता. सोयगाव जि. औरंगाबाद) येथील रहिवासी होत्या. ऊसतोड करणाऱ्या यांच्या टोळीने सकाळपासून दुपारपर्यंत माल तोडून गाडी भरून दिली. दुपारनंतर पुन्हा एक ट्रक माल तोडून ठेवला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सायंकाळी ऊसतोड आटोपून वाढे विक्रीसाठी हे दाम्पत्य शहरटाकळीत जात असताना अक्काबाईंना अत्यवस्थ वाटायला लागले. त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना तातडीने शहरटाकळी येथून ज्ञानेश्वर कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु औषधोपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.