अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या अभिजीत सुखदेव साबळे (वय २७, रा. उंबरी, बाळापूर, ता. संगमनेर) या आरोपीस ठाणे जिल्ह्यातून गोवेली येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकातील पोलिस कर्मचारी करीत असताना बुधवार दि.१४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हा गोवेली (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे अल्पवयीन मुलीसह राहत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानूसार पोहेकॉ. सोमनाथ कांबळे, पोना. भरत डंगोरे, मपोना. रिना म्हस्के, मपोना. मोनाली घुटे, पोहेकॉ. बाळासाहेब भोपळे यांनी गोवली येथे जावून सदर आरोपीचा शोध घेतला असता साबळे हा अल्पवयीन मुलीसह मिळून आल्याने त्यास व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन आश्वी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.