पारनेरच्या तहसीलदाराना वाळू तस्करांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांच्या वाहनावर वाळू तस्करांकडून वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नगर- पुणे महामार्गावर घडला. या प्रकारामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, तालुक्यातील वाळू तस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रकरणी वाळूचा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी- गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार सागरे या नगर- पुणे महामार्गावर सुपा गावाजवळून चालल्या असताना या ठिकाणी चोरटी वाळू वाहतूक करणारा डंपर दिसला. 

या डंपरचा तहसीलदार सागरे यांनी पाठलाग करून डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, डंपर चालकाने तहसीलदारांच्या वाहनावरच डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी तहसीलदार सागरे या तत्परतेने दरवाजा उघडून बाहेर आल्याने त्या बचावल्या. त्यानंतर अव्वल कारकून राजेंद्र शिंदे व लक्ष्मण बेडर यांनी काही लोकांच्या मदतीने डंपर ताब्यात घेतला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, पारनेर तहसील कार्यालयातील शरद झावरे, प्रशांत सोनवणे, सचिन औटी आदी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यापूर्वीही तहसीलदार भारती सागरे यांच्यावर वाळू तस्करांकडून डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.