जिल्हा विभाजनास राधाकृष्ण विखे,बाळासाहेब थोरातांचा विरोध !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाने व लोकसंख्येने अत्यंत मोठा आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन केले जाईल अशी घोषणा केली होती. तेव्हा युती शासनाने जिल्ह्याचे तात्काळ विभाजन करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता विधानभवनाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसुन घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. नगर जिल्ह्याचे विभाजन करावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नेवासा मतदारसंघाचे आ.बाळासाहेब मुरकुटे, कोपरगावच्या आ.स्नेहलता कोल्हे, शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिका राजळे, पारनेरचे आ. विजय औटी, श्रीगोंद्याचे आ. राहुल जगताप, श्रीरामपूरचे आ.भाऊसाहेब कांबळे, नगर शहराचे आ.संग्राम जगताप, अकोल्याचे आ. वैभव पिचड आदींनी यावेळी घोषणाबाजी करत नगर जिल्ह्याच्या विभाजनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही यावेळी उपस्थित होते.मात्र विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजीमंत्री बाळासाहेब थोरात अनुपस्थित होते.अहमदनगर जिल्हा विभाजनास त्यांचा विरोध दिसू लागला आहे,त्याची चर्चा जिल्ह्यात झडू लागली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे प्रवेशद्वाराजवळ आगमन झाल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनी वरील सर्व आमदारांच्या वतीने जिल्हा विभाजनाच्या संदर्भातील सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.त्यानंतर विधानभवनात जाणाऱ्या सर्व आमदाराकडेही या संदर्भात पाठींबा द्यावा, अशी मागणी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.