विकासकामांचा वेगही वाढणार - खासदार दिलीप गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहर व जिल्ह्यातून जाणारे ९ महामार्ग आता राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतरीत होणार असून, त्यांच्या कामांना वेग येण्यासाठी नगरला राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे कार्यालय सुरू झाले आहे. नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. सारसनगर जवळील महात्मा फुले चौकात असलेल्या जिल्हा मजूर फेडरेशनच्या इमारतीत हे कार्यालय सुरू झाले आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पुण्या-मुंबईहून विदर्भ व मराठवाड्यात जाण्यासाठी नगरमार्गे जावे लागते. त्यामुळे नगर शहर व जिल्ह्यातून जाणारे बहुतांश रस्ते महामार्ग झाले असून, चार पदरी आहेत. हेच रस्ते आता राष्ट्रीय महामार्ग होणार असून, सहा पदरी केले जाणार आहेत. पुणे, औरंगाबाद, मनमाड, कल्याण, दौंड, जामखेड, सोलापूर, पाथर्डी अशा या रस्त्यांचे रुंदीकरण केंद्र सरकारच्या निधीतून केले जाणार असल्याने या कामांना गती देण्यासाठी येथे केंद्र सरकारच्या सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे स्वतंत्र कार्यालय करण्यात आले आहे.

त्याचे उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, नगरसेवक सुवेंद्र गांधी, मजूर फेडरेशनचे संचालक झुंबर पवार, सचिव विठ्ठल सांगळे, उपव्यवस्थापक प्रकाश कराळे, विजय रासकर, तुकाराम बोरुडे, अभियंता राजगुरु, संग्राम म्हस्के, नेवासा भाजप तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे आदी या वेळी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगरमधून जाणारे सर्व ९ महामार्ग सहा पदरी होणार असून, शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता अशी कोट्यवधी रुपयांची कामेही केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मंजूर केली आहेत. ही कामे लवकर सुरू होण्यासह प्रशासकीय तरतुदी पूर्णत्वास येण्यासाठी नगरमध्ये राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे कार्यालयास केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी प्राधान्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता मुंबई, औरंगाबाद, नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही व विकासकामांचा वेगही वाढणार आहे, असे गांधी या वेळी म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.