जामखेडमध्ये शेतीच्या वादातून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील सातेफळ, येथील जमिनीच्या वादातून दिगंबर क्षीरसागर याच्यावर उध्दव क्षीरसागर,पप्पू क्षीरसागर, सागर बाळू राऊत या तिघांनी प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. दरम्यान पोलिसांनी या तीन आरोपींना अटक करुन त्यांना आज जामखेड न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील सातेफळ येथील शेतीच्या वादातून क्षीरसागर कुटुंबातील दिगंबर क्षीरसागर व एकनाथ क्षीरसागर या दोघा चुलत भावात शेतीचा वाद कोर्टात सुरू होता. परंतु हा निकाल दिगंबर क्षीरसागर याच्या बाजूने लागला. दिगंबर हा शेतातील ऊस तोडणी करत असताना एकनाथ याने त्यास प्रतिबंध केला.

या झटापटीत दिगंबर क्षीरसागर याच्यावर उध्दव अनंता क्षीरसागर, पप्पू उध्दव क्षीरसागर, सागर बाळू राऊत, राजू उध्दव क्षीरसागर ,रेखाबाई उध्दव क्षीरसागर,आशाबाई बाळू राऊत, बालाजी पूर्ण नाव माहीत नाही. सर्व राहणार सातेफळ या सर्वांनी दिगंबर बबनराव क्षीरसागर याला हातातील चाकूने तोंडावर पाठीवर तसेच उजव्या दडावर वार केले. यावेळी त्याला सोडविण्यासाठी वडील आले असता. त्यांच्याही कानावर चाकू मारुन जबर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवीगाळ करत, परत शेतात आलात तर तुमचे मुडदे पाडू अशी धमकी दिली. दिगंबर क्षीरसागर याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जबर जखमी झाला आहे. त्याला खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला नगर येथे हलविण्यात आले आहे. पाठीत व तोंडावर गंभीर जखमांमुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे. हे.कॉ नवनाथ भिताडे. मु पो गणेश साने, मनोज साखरे हे करत आहेत. आरोपी पसार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.