गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात बुधवारी रात्री दहा वाजता माणिक शहॉबाबा दग्र्याजवळील धोकादायक वळणावर गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने ट्रक घाटातील रस्त्यावरच उलटला. ट्रकमध्ये इंडेण कंपनीचे गॅस भरलेले तीनशे सिलेंडर होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अपघातानंतर ट्रकमधील् सिलेंडर रस्त्यावर पडले. अपघातात ट्रकचालक शिवाजी सोळंके रा. सोनवटी, ता. शेलू, जि. परभणी हा ट्रकमध्येच अडकून पडला होता. त्यास करंजी येथील गजानन गायकवाड, एल. डी. अकोलकर, विष्णू चव्हाण, रमेश भाकरे या तरुणांनी ट्रकची समोरील काच फोडून बाहेर काढले. 

त्याच्या हाताला जबर मार लागला आहे. अपघातग्रस्त ट्रक चाकणहून परभणीकडे गॅस सिलेंडर घेऊन चालला होता. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघातची माहिती समजताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक पी.जी. ठाकरे यांनी अपघातस्थळी येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पहाटेच्या सुमारास काही वाटसरूंनी अपघातग्रस्त ट्रकमधील सिलेंडर ट्रकचालकास दमदाटी करून चोरून नेल्याचे ट्रकचालकाकडून समजले. एकाच वळणार सातत्याने अपघात घडत असल्याने या धोकादायक वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.