वाळूतस्करावरील महसूलची कारवाई संशयास्पद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस आणि महसूलच्या पथकाने एकत्रित वाळू तस्करांवर कारवाया कराव्यात असे जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांचे आदेश असताना देखील महसूलची पथके स्वतंत्ररित्या तस्करांवर कारवाया करताना अडचणीत सापडतात. महसूलच्या पथकांची हीच कृती संशयास्पद ठरत असल्याने महसूल आणि तस्कारातील मिलीभगत त्यांच्या वरील हल्ल्यासाठी पूरक ठरू लागली आहे. या मुळे शासनाला देखील कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ संगमनेर तालुक्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर जिल्यातील संगमनेर, कोपरगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, श्रीरामपूर आदि तालुके सुरक्षितरित्या वाळू तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. महसूल विभागाने खरच ठरविले तर वाळू तस्करी थांबविणे फारशी कठीण बाब नाही. मात्र या उलट स्थिती येथे निर्माण झाली असून महसूलच्याच आशीर्वादाने वाळू तस्करी फोफावली आहे. येथील वाळूला पुणे-मुंबई सह राज्याच्या अन्य भागात मोठी मागणी आहे. त्यामुळे दिवसरात्र येथे वाळू तस्करी जोमात सुरु असताना देखील महसुलाला याची माहिती होत नाही हे विधान जरा धाडसाचे ठरेल. येथील मार्ग थेट महसूलच्या दारावरून जात असल्याने पोलीस देखील या कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात.

महसूलच्या पथकावर, अधिकाऱ्यांनवर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे व तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांच्या एकत्रित बैठकीत हल्ले टाळण्यासाठी व वाळू तस्करी थोपविण्यासाठी महासुलने स्वतंत्रपने पथकांची स्थापना करून या पथकासोबत दोन शस्र धारी पोलीस नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. पोलीस संरक्षण असल्या शिवाय महसूलच्या पथकाने कारवाया करू नयेत असे आदेश असताना देखील महसूल विभागाकडून स्वतंत्र कारवाई केली जात असल्यानं ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.