२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा…

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्चपर्यंत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही अटक करा, नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा सरकारला दिला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडे यांचीही कोरेगाव-भीमा हिंसाचार भडकावण्याच्या कटात महत्त्वाची भूमिका असल्यामुळे मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर आता संभाजी भिडेंनाही २६ तारखेपर्यंत अटक करा, अन्यथा कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे मुंबईत मोर्चा काढू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बंद केलेल्या शिष्यवृत्ती सुरु करा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाने हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.