दोन्ही समाजाच्या सहमतीने राम मंदिर होणार :- श्री श्री रविशंकर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी अयोध्येत राम मंदिरच होणारच आणि तेही दोन्ही समाजाच्या सहमतीने बनेल, असा दावा केला आहे. ते अहमदनगरला ज्ञानमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त साधकांशी संवाद साधताना बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यांनी यावेळी आतापर्यंत हातात घेतलेल्या कामाला यश आले असल्यामुळे या कामालाही यश येईल, असा विश्वास केली आहे. त्याचबरोबर, इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

श्री श्री रविशंकर यांनी यावेळी बोलताना राम मंदिराच्या चर्चांचा तपशील देत, मंदिर होणारच असल्याचे सांगितले. बंगळुरुला निर्मोही अखाड्याचे ९० वर्षीय वयोवृद्ध रामचंद्र भेटले. त्यांनी यावेळी मध्यस्थी करण्याची गळ घालून या जन्मी अयोध्येत राम मंदिर पाहायची इच्छा व्यक्त केली. पण या विषयात मोठ्या प्रमाणात राजकारण असल्याचेही ते म्हणाले. 

तसेच, मी या प्रकरणी २००२ सालीदोन्ही समाजाला एकत्र करुन समझोता करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी अपयश आल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शंकराचार्य सरस्वती यांनीही केला. पण त्यांनाही अपयश आल्याचे रविशंकर यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.