शिवसेनेच्या खंडणीबहाद्दर जिल्हा परिषद सदस्याला अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यला मुंबईतील पवई भागातील एका नामांकित बिल्डरकडून २ कोटींची खंडणी घेताना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना आज कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे गुलाब विठ्ठल पारखे (ता. जुन्नर) नाव असे आहे. शिवसेनेच्या तिकीटावर पारखे जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. भादवि कलम ३८४ (खंडणी) नुसार पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पारखे यांनी पवईत कार्यालय असणा-या एका नामांकित बिल्डरकडे २० कोटींची रुपयांची खंडणी मागितली. या बिल्डरबाबत त्याआधी त्यांनी माहिती अधिकारातून काही माहिती घेतली होती. यात काही घोळ असल्याचे पारखे यांना माहित असल्यामुळे माहिती सार्वजनिक न करण्यासाठी पारखे यांनी बिल्डरकडे खंडणी मागितली. पण संबंधित बिल्डरने हे प्रकरण दाबण्यासाठी पारखेला १० लाख रूपये दिले. पण यावर त्यांचे समाधान झाले नाही.

बिल्डरला पैशांसाठी पारखे व त्याची माणसे आणखी धमकावू लागली. आम्हाला पैसे नाही दिले तर माध्यमांकडे जाऊ व तुमची पोलखोल करू, अशी धमकी दिली. यानंतर बिल्डरच्या कार्यालयातून पवई पोलिस ठाण्यात धाव घेतली व याबाबतची माहिती दिली. सोबतच पुरावा म्हणून फोन कॉल रिकॉर्ड सादर केले. पवई पोलिसांनी यानंतर एक पथक बनवून सापळा रचून खंडणीखोर गुलाब पारखे यास मुलुंड येथील एका हॉटेलमधून खंडणीची २ कोटींची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. पारखे याने वापरलेली फोर्च्यूनर गाडी सुद्धा पवई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.