धनादेश मुदतीत वटला नाही,ऊस तोडणी कंत्राटदारास एक महिन्याच्या कैदेची शिक्षा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊसतोडणी कंत्राटदार विनायक दामू जाधव कराराची पूर्तता न करता हिशोबाची देय रक्कम १ लाख १२ हजार ७८२ चा धनादेश वटविला नाही म्हणून दाखल फौजदारी केसमध्ये तोडणी कंत्राटदाराने देय असणारी रक्कम १ लाख १२ हजार ७८२ व त्यावर व्याजाची ९ टक्के प्रमाणे होणारी रुपये १ लाख ६७ हजार ४८१ अशी एकूण रुपये २ लाख ८० हजार २६३ रक्कम कंपनीस देण्याचा व एक महिन्यासाठी कैद अशी शिक्षा प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधिश सुधीर बोमीडवार यांनी ठोठावली असून फिर्यादीस कॉम्पेन्सेशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ऊसतोडणी मुकादम विनायक दामू जाधव, (रा.शेकटे-लाडजळगाव, ता.शेवगाव) याने कराराप्रमाणे पूर्तता केली नाही त्यामुळे हिशोबाची देय रकमेपोटी कारेगाव शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीस दिलेला अशोक बँकेचा १ लाख १२ हजार ७८२ रुपयांचा धनादेश वेळेत वटला नाही. म्हणून संस्थेचे जेठमल मेहेर यांनी श्रीरामपूर न्यायालयात त्यांचे विरुद्ध नेगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे कलम १३८ अन्वये क्रिमिनिअल केस नं.१३९४/२००१ दाखल केली होती.

त्याच्या चौकशीत न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेतील या प्रकरणात न्यायालयाने धनादेशातील रक्कम दुपटीने फिर्यादीस देण्याबाबत निकाल दिला आहे.फिर्यादीच्या वतीने सदर प्रकरणात ॲड.जगन्नाथ राठी यांनी काम पाहिले. या निकालाकडे शेवगाव परिसरातील ऊसतोडणी ठेकेदारांचे लक्ष लागले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.