ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना दांडी मारणारे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पूर्वपरवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सतत दांडी मारणाऱ्या नगर तालुक्यातील वडारवाडी येथील माजी सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी अपात्र ठरवले. या सदस्यांना सभांना उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने कारवाई करण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वडारवाडी येथील उपसरपंच कैलास पगारे, रंजना सपकाळ, विनू इस्सर, नंदकुमार अहिरे, योगेश भुजबळ हे ५ ग्रामपंचायत सदस्य ३० एप्रिल २०१६ ते २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिले. इस्सर या माजी सरपंच, तर पगारे उपसरपंच आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४० (१) (ब) नुसार सतत गैरहजर राहिल्यास ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरतो. या सदस्यांनी कोणतेही उत्तर किंवा लेखी खुलासा केला नाही. यामुळे अध्यक्ष विखे यांनी या ५ सदस्यांना अपात्र ठरवले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.