निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीने श्रीगोंद्याचे राजकारण तापले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगराध्यक्षपदी संधी मिळावी, याकरिता माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे (पाचपुते गट) आणि गयाबाई सुपेकर यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. नगराध्यक्षपदाचा खांदेपालट होणार का, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरपरिषदेची निवडणूक २०१४ मध्ये झाली. माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या ताब्यात सत्ता आल्याने छाया गोरे यांना नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. त्यांनी सुमारे २८ महिने हे पद सांभाळले. त्यानंतर सुनीता शिंदे (पाचपुते गट) यांना दोन महिन्यांसाठी संधी देण्यात आली. 

त्यानंतरील आरक्षण खुल्या वर्गासाठी असल्याने मनोहर पोटे (पाचपुते गट) यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. जानेवारी २०१९ ला विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. उर्वरित ९ महिन्यांसाठी नगराध्यक्षपदी संधी मिळावी यासाठी कोथिंबिरे यांनी तयारी सुरू केली आहे.

नगरपरिषदेमध्ये सध्या सत्ताधारी पाचपुते गट अल्पमतात आहे. १९ नगरसेवक असलेल्या पालिकेत पाचपुते यांच्याकडे ९, तर विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीकडे १० नगरसेवक आहेत. शिंदे व पोटे यांनी नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी विरोधी गटाचे नगरसेवक फोडले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सध्याचे संख्याबळ पाहता कोथिंबिरे यांना बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी जुळवाजुळव करावी लागेल. बबनराव पाचपुते काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष बदलाबाबत रोज नगरसेवकांमध्ये चर्चा सुरू आहे. बैठक होणार आहे, असे सांगितले जाते. 

आगामी नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने उरलेल्या ९-१० महिन्यांसाठी संधी द्यावी, अशी इच्छुक कोथिंबिरे व सुपेकर यांची अपेक्षा आहे. परंतु नेते मंडळींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीने श्रीगोंद्याचे राजकारण तापले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.