व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्ह मजकुरामुळे संगमनेर मध्ये तणाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्हॉटस् अॅपवर एका तरुणाने समाजातीलच दुसऱ्या गटासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने दुसऱ्या गटातील अज्ञात व्यक्तींनी राजापूर रस्त्यावर एका दुकानाची मोडतोड केली. त्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. शहर पोलिसांनी यासंदर्भात एकावर धार्मिक भावना दुखावल्याचा, तर दुसऱ्या गटातील चार-पाच अज्ञातांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. रात्री उशिरा यासंदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तणाव नियंत्रणात आणला. मोमीनपुरा येथे राहणारा रिझवान मोमीन चौधरी (३८) याने व्हॉटस् अॅपवर ग्रूप तयार केला आहे. या ग्रूपवर इम्तियाज रहीमखान पठाण याने आक्षेपार्ह मजकूर टाकला. 

याच समुहात दुसऱ्या गटातील काही लोकांचा समावेश आहे. यामुळे दोन गटांत तणाव निर्माण झाला. चौधरी याने दिलेल्या तक्रारीवरुन पठाण याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून निरीक्षक गोकुळ आैताडे तपास करत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, या घटनेचे पडसाद सायंकाळी राजापूर रस्त्यावर उमटले. एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात धुडगूस घालत मोडतोड करण्यात आली. हिना मोहसीनखान पठाण यांच्या तक्रारीवरुन चार-पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. शहरातील एका भागात चौकाच्या नामफलकावरुन व्हायरल झालेल्या पोस्टमुळे पोलिसांची धावपळ उडाली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.