तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोरास शिर्डीत चोपले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- परगावी जाण्यासाठी एसटी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोराची शिर्डी बसस्थानकावरील प्रवाशांनी व नागरिकांनी धुलाई केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेल्या तरुणीचा साईबाबा रुग्णालयापासून पाठलाग करणाऱ्या एका टवाळखोराने तिच्याशी असभ्य वर्तन केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ही बाब या तरूणीने बसस्थानकावरील कर्मचाऱ्यांना सांगितली. या तरुणाचा शोध घेत प्रवासी व नागरिकांनी त्याची यथेच्छ धुलाई केली. पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक संदाप कहाळे बसस्थानकावर दाखल झाले. तरुणीची छेड काढणाऱ्या टवाळखोरास त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
शिर्डीत ठिकठिकाणी शालेय मुली, तसेच महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत असतात. मात्र, या टवाळखोरांवर शिर्डी पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावते आहे. यापूर्वी पोलिसांनी धूमस्टाईल चोर, तसेच टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी बीटमार्शलची नेमणूक केली होती. मात्र, काही कालावधीनंतर हे बीटमार्शल गायब झाल्याने टवाळखोरांची संख्या वाढली आहे. पुन्हा हे बीटमार्शल पथक कार्यरत करावे, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिर्डी बसस्थानक प्रमुख टी. बी. जगताप म्हणाले, गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी बसस्थानकावर १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यातील दोन कॅमेरे चहुबाजूचे दृश्य टिपत असतात. कॅमेरे बसवल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून पाकीटमारीला आळा बसला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गुन्हेगारांनी चांगला धसका घेतला अाहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.