महिला सरपंचासह ग्रामसेवकास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सारोळा कासारच्या सरपंच सौ.आरती रवींद्र कडूस,ग्रामसेवक टी.के.जाधव व इतरांना ग्रामपंचायत सदस्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.याप्रकरणी नामदेव नाथा काळे याच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सारोळा कासार ग्रामपंचायतला14 व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीतून काळे मळा जिल्हापरिषद शाळेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.या कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी वाजता सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता.

कार्यक्रम सुरु असताना ग्रा.प.सदस्य नामदेव काळे तेथे आला व तुम्ही कोणाला विचारून काम सुरु केले मी काम होवू देणार नाही असे म्हणत ठेकेदाराला दमबाजी करून काम बंद पाडले.सरपंच आरती कडूस यांनी काळे यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने कडूस यांना अरेरावी करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

तेथे उपस्थित ग्रामसेवक इतर ग्रा.प. सदस्य यांनीही त्यास समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कुणाचेही न ऐकता ठेकेदार व त्याच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत काम बंद पाडले.याप्रकरणी सरपंच आरती कडूस यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास हेड कॉ.लबडे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.