आगामी 5 वर्षांत 500 युवा उद्योजक तयार करणार - सत्यजीत तांबे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निरोगी समाज निर्मिती बरोबर युवकांच्या करिअरसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या जयहिंद युवा मंचच्या वतीने पहिल्या टप्यातील युवा उद्योजक प्रशिक्षणास सुरुवात झाली असून आगामी 5 वर्षांत 500 युवा उद्योजक तयार करणार असल्याचे जयहिंदचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अ.नगर येथील जयहिंद युवा मंचच्या कार्यालयात आज पहिल्या टप्प्यातील 25 युवकांना उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते.यावेळी ऑस्ट्रलियातील प्रशिक्षक सचिन शर्मा व पुणे येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रशिक्षक अभिजीत शिंदे आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून 1988 पासून सातत्याने युवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत त्यांना करिअरसाठी व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. सांस्कृतिक स्पर्धा,क्रिडा स्पर्धा,आंतरराष्ट्रीय शिबीरे,आरोग्य शिबीरे,वाचन चळवळ,करिअर गायडन्स,बचतगट,नोकरी मेळावे असे विविध उपक्रम राबविले आहे.सध्या बेरोजगारी हा मोठा प्रश्‍न समाजासमोर उभा राहिला आहे.

मागील 25 वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही.त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे.तर दुसर्‍या बाजूला दरवर्षी सुमारे 80 हजार विद्यार्थी उच्च शिक्षण घेवून बाहेर पडत आहेत.या युवकांना योग्य प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी जयहिंद उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत नवीन 500 युवा उद्योजक निर्माण करणार आहे.

यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले कि,जयहिंद ही पक्षविरहीत संघटना असून युवकांना प्रशिक्षण देणे व उद्योजक निर्माण करणे व 5 वर्षांत 500 उद्योजक तयार करुन सुमारे 25000 रोजगार निर्माण करण्याचे आपले ध्येय आहे.आज ही सुरुवात असून यापुढे आणखी उपक्रम राबविणार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकर्ते,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.