नीरव मोदीने लाटलेल्या जमिनीवर शेतकरी करणार ताबा घोषित !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंजाब नॅशनल बॅंकेत घोटाळा करणारे हिरे व्यापारी नीरव मोदी याने कर्जत तालुक्‍यातील खंडाळा येथे लाटलेल्या अडीचशे एकर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने काळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दि. 17 मार्च रोजी या लाटलेल्या जमिनीवर मूळ शेतकरी नांगर फिरवून आपला ताबा घोषित करणार असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कर्जतचे माजी सभापती किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात ऍड. कैलास शेवाळे, मिलिंद बागल, भाऊसाहेब वाघमोडे, माजी सरपंच रघुनाथ खरात, ऍड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, हराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम आदींसह ग्रामस्थ इर्जिक पध्दतीने सहभागी होणार आहे. आंदोलनात सदर जमीनीवर ट्रॅक्‍टर व बैलांच्या सहाय्याने नांगर फिरवून मुळ शेतकरी आपला ताबा घोषित करणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सत्तेवर येण्यापूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यावर भारताबाहेरील काळा पैसा तर आला नाही. मात्र, भारतात विजय मल्ल्‌या, नीरव मोदी यांच्या सारख्यांनी दिवाळखोरी करुन देशा बाहेर पलायन गेले. अच्छे दिन सामान्य माणसाला आले नाही. तर अच्छे दिन अशा ठकविणाऱ्या व्यापारी उद्योजकांचे आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.