केडगाव पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईल!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावमधील जनतेने कायम शिवसेनेची पाठराखण केली आहे. मनपात जेव्हा जेव्हा युतीची सत्ता आली, तेव्हा तेव्हा केडगावला विकासात्मक कामाला वेग मिळाला. केडगावमध्ये युवकांची संख्या मोठी असून, आता हे अनेक युवक शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेची कार्यपद्धती युवकांना आकर्षित करणारी असून, त्यांचे प्रश्‍न शिवसेनाच सोडवू शकते, याची युवकांना जाणीव आहे. शिवसेनेत शिवसैनिकांना नेहमीच मानाचे स्थान दिले जाते. शिवसैनिकच माझी खरी संपत्ती आहे. केडगावकरांनी माझा वाढदिवस साजरा करून माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मी आभारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव शिवसेना विभाग व युवा सेनेच्या वतीने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, संजय कोतकर, प्रवक्ते रमेश परतानी, उपशहरप्रमुख वसंत शिंदे, मंगेश शिंदे, सुनील सातपुते, भाकरेमहाराज, राजेंद्र पठारे, संग्राम शेळके, प्रमोद ठुबे, विजय पठारे, संग्राम कोतकर, अमोल येवले, मुकेश गावडे, अजय आजबे, डॉ. श्रीकांत चेमटे, कैलास करांडे, प्रफुल्ल साळुंके, युवराज कोतकर, वैभव गोळे, सागर गायकवाड, बबलू कोतकर, अनिकेत झरेकर, पिंटू मोढवे, गौरव कार्ले, प्रेम कोहक, ओंकार कोतकर, सलीम शेख, आदित्य शिंदे, चेतन वर्मा, पंडित सातपुते, रामदास कोतकर, अब्दुल बेकरीवाले, रावसाहेब हुलगे, राजेंद्र पठारे, पप्पू ठुबे आदी उपस्थित होते.

श्री. राठोड पुढे म्हणाले की, केडगावचे हर्षवर्धन कोतकर यांच्यावर युवा सेनेच्या शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून युवकांचे ते संघटन करीत आहेत. केडगावमधील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने शिवसेना व युवा सेना प्रयतक्‍ करीत आहे. केडगाव मनपा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.