श्रीगोंद्यात वाळूतस्करांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरानजीक भोळे वस्तीशेजारी असलेल्या आंबिल ओढ्यातून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे अवैध वाळूउपसा होत आहे. तो वाळूउपसा त्वरित बंद करावा, या मागणीसाठी भोळेवस्ती येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन दिल्यामुळे वाळूतस्करांनी मंगळवारी (दि. 13) रात्री 9 च्या सुमारास एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंदा शहरापासून अगदी 5 कि.मी. अंतरावर भोळेवस्ती नगरपालिका हद्दीमधील आंबिल ओढा आहे. या ओढ्याच्या शेजारी चंद्रकांत गिरजा गाडेकर यांच्या मालकीची शेतजमीन आहे. परंतु, या शेतजमीन लागूनच राज्य शासनाचे सुमारे 5 एकर गायरान क्षेत्र आहे. या आंबिल ओढ्यामधून श्रीगोंदा शहरातील काही वाळूतस्कर दोन ते तीन महिन्यांपासून जे.सी.बी. यंत्राच्या साहाय्याने वाळूउपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत. 

त्यातच चंद्रकांत गाडेकर यांची पाण्याची विहीर ओढ्याच्या शेजारी असल्याने व वाळूतस्कर खोलवर वाळूचे उत्खनन करत असल्याने गाडेकर यांच्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने त्यांची पिके जळून खाक झाली. त्यामुळे त्यांनी सुरू असलेला अवैध वाळूउपसा बंद करावा याबाबत काही ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार यांना सोमवारी (दि. 12) दिले.

याची माहिती वाळूतस्करांना समजताच मंगळवारी (दि. 13) चंद्रकांत गाडेकर रात्री 8.30 वा. सुमारास इले. मोटार चालू करण्यासाठी गेले असता तेथे असलेल्या आरिफ महंमद मालजप्ते यांच्या मालकीचा जे.सी.बी. व नागराज कोथिंबिरे यांच्या एका ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने कोंडिबा भोळे, तात्याराम भोळे, नागराज कोथिंबिरे व एक अनोळखी असे चारजण वाळूउपसा करत असल्याचे दिसले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यावर “तुम्ही वाळूउपसा करू नका,’ असे म्हणताच या चारही जणांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तू आमच्या विरोधात तहसीलदाराकडे तक्रारी करतोस काय?’ असे म्हणत नागराज कोथिंबिरे याने जे.सी.बी.च्या बकेटने जोरात छातीत मार दिला. त्यामुळे ते खाली पडले व कोंडिबा भोळे याने ट्रॅक्‍टर चालू करून अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडेकर तेथून जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना तात्याराम भोळे याने पकडून खाली पाडले व लाथा-बुक्‍क्‍याने मारहाण केली. 

चारही आरोपी तेथून यंत्रे घेऊन पळून गेले.यामध्ये चंद्रकांत गाडेकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे औषधोपचारासाठी आणले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.