आयुष्यात झोकून देवून जिद्द, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे यश मिळाल - स्लमडॉग सीए अभिजित थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- यशाला शॉर्टकट नाही. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही मी मोठ स्वप्न पाहिलं. त्यासाठी झपाटून परिश्रम घेतले. वाट्टेल ती काम केली. कशाची लाज बाळगली नाही. सर्वस्व झोकून देत जिद्दीने, चिकाटीने केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमा मुळेच प्रतिकूल परिस्थितीतूनही सीए होऊ शकलो, असे प्रतिपादन स्लमडॉग सीए अभिजित थोरात यांनी केल.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
न्यू आर्ट्स महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि थिंक ग्लोबल फौंडेशनच्या संयुक्त वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी “सलाम जिद्दीला- टॉक विथ स्लमडॉग सीए” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख (पुणे) यांनी थोरात यांना बोलत केल. जिल्हा मराठा संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिरूर नगरपालिकेच्या शाळेत माझ प्राथमिक शिक्षण झाल. त्यावेळी इतर मुलांकडे दप्तर असायचं. माझ्याकडे मात्र साधी पिशवी होती. आई बरोबर आम्हा भावंडांचा जगण्याचाच संघर्ष सुरु असताना दप्तर घेण्याचीही ऐपत नव्हती. पण शाळेतल्या माझ्या शेख बाईंनी पहिला नंबर आला तर मी दप्तर देईल अस आमिष दिल आणि मी झपाटल्या सारखा अभ्यास करून दप्तराच पाहिलं बक्षीस मिळवलं. यातूनच पुढील आयुष्यात अनेक स्पर्धांना सामोरं जावून यश मिळविण्याची सवय, जिद्द आणि चिकाटी माझ्यात निर्माण झाली.

लहानपणी एकदा पैसे चोरल्याच्या आरोपामुळे मी अस्वस्थ झालो. शाळा शिकण्याच्या वयात मी पेरू विकले, वीट भट्टीवर रोजाने काम केल, लग्नामध्ये पन्नास रुपयाच्या मानधनावर केटररवाल्यांकडे काम केल, किराणा दुकानात काम केल. कारण पैशाला पर्याय पैसेच होते. यामुळे आयुष्यात पुढे कुठल्याही कामाची लाज मला वाटली नाही. आयुष्यात निंदा करणारी खूप माणसं भेटली. पण बळ देवून पाठीशी उभी राहणारी माणसं पण देवा सारखी भेटली. म्हणूनच सीएच स्वप्न घेवून पुण्याला जाऊ शकलो.

तयारी सुरु असताना घर चालवण्यासाठी आईने एकाकडून व्याजाने पैसे घेतल्याच समजल्यावर निराश होवून परत शिरूरची वाट धरली. पण नियतीला बहुदा मला वाऱ्यावर सोडायचं नव्हत. वयाच्या २२ व्या वर्षी मी सीए झालो आणि आयुष्य बदलून गेल. यावेळी अभिजित यांनी अनेक गमतीदार किस्से देखील सांगितले. लग्नाच्या प्रांजल पुराणाला विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमामुळे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मुलांना भावी वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली.

दीपा देशमुख यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले. परंतु स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने थिंक ग्लोबल फौंडेशनने मला दिलेल्या पुरस्कारच्या आठवणी माझ्यासाठी खास आहेत. अच्युत गोडबोले, सुरेश वाडकर अशा कर्तुत्वान व्यक्तींना ज्या पुरस्काराने सन्मानित केले ततोच पुरस्कार मलाही मिळाल्याचा मला अभिमान आहे. अमरापूरकर नगरचे भूषण होते. अभिनया बरोबरच ते चळवळीतील संवेदनशील कार्यकर्ते देखील होते. महाविद्यालयाच्या याच सभागृहात तो भव्य-दिव्य सोहळा पार पडला होता. त्याच्या आठवणीने माझे मन आज भारावून गेले आहे.

पुस्तक खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी केली गर्दी
स्लमडॉग सीए आणि दीपा देशमुख यांची कॅनव्हास, जीनियस, तसेच अच्युत गोडबोले, प्रकाश आमटे, डॉ. आनंद नाडकर्णी,डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. अनिल अवचट, ज्ञानेश्वर मुळे यांच्यावर लिहिलेल्या सुपर हिरोच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी यावेळी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केल. संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे, थिंक ग्लोबल फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचलन महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक डॉ. सतीश जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि बीबीए विभागाचे प्राध्यापक वृंद, थिंक ग्लोबल फौंडेशनचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

यावेळी उपप्राचार्य अरुण पंधरकर, उपप्राचार्य आर. जी. कोल्हे, थिंक ग्लोबलचे उपाध्यक्ष संजय पाठक, स्वप्नील पाठक, चित्रपट निर्माते श्रीपाद दगडे, सीए राजेंद्र काळे, प्रा. पेटकर, प्रा. सातभाई, प्रा. थोरात, प्रा. ठाकूर आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.