सदगुरू किसनबाबा चौरे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प.पू. आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांनी स्थापन केलेल्या सत्य अविनाश पारख पद समाजाचे ज्येष्ठ गुरुपुत्र ब्रहनिष्ठ सद्गुरू हरिदास बाबा यांचे पुत्र सद्गुरू किसन बाबा चौरे यांचा पुणतिथी सोहळा दि.15 मार्च रोजी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठावर संपन्न होत आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सकाळी 11 वा. शिष्य सांप्रदायाचा आध्यात्मिक चर्चात्मक सत्संग होईल. त्यानंतर दुपारी 3 वा. सद्गुरू मूर्तीची मिरवणूक होईल. या वेळी सद्गुरू पादुका पूजन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री 9 ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहिरांचा आध्यात्मिक भजनांचा कार्यक्रम होईल.

तालुक्यातील इंग्रज कालीण, क्रांतीकारी विचार सरणीतील, अध्यात्मातील गाडे अभ्यासक, ज्यांनी वडगाव सावताळच्या जंगलात तपचर्या करून दत्त सावताळ प्रसन्न करून घेऊन आपल्या लेखणीतून सरस्वतीचे दर्शन गद्य व पद्य रुपाने करूण अध्यात्म साहीत्याचे लिखाण करून व अध्यात्माचा सार सोप्या शब्दात सर्व सामान्यांना समजेल अशा प्रकारे अध्यात्म साहीत्य रचना करत ढोलकी, डफ, तुणतुन्याच्या माध्यमातुन पारंपारीक भेदीक भजणांच्या माध्यमातुन उतरविणारे थोर संत आत्मज्ञानी गणपतबाबा चौरे यांचे जेष्ठ नातु,प.पु. सद्गुरू किसनबाबा चौरे.

आत्मज्ञानी गणपत बाबांनी समाज ऊध्दाराच्या दृष्टिने स्थापन केलेल्या श्री.सत्य अविनाश पारख पद समाज, या समाजाचे शिष्य मंडळ संपुर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मुलण,समाज प्रबोधन करत अध्यात्माचा पसार व प्रचाराचे कार्य करत आले आहे. आत्मज्ञानी गणपत बाबांचे जेष्ठ पुत्र ब्रम्हनिष्ठ हरिदास महाराज यांनीही मोठी अध्यात्म साहीत्य निर्मिती करत पारख पद आरसा सारखा महान ग्रंथ लिहून हा मार्ग जोपासला.

त्यांच्या नंतर प.पु. सद्गुरू किसन बाबांनी ही धुरा अखंडीत सांभाळत मोठे शिष्य मंडळ तयार केले. या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली जिल्ह्यातुन आलेल्या शिष्य मंडळ, गुरू बंधुसाठी, दुपारी 12 ते 2 वा. पारखपदी सत्संगाचे आयोजन करन्यात आले असुन, दुपारी 2 ते 6 वाजे पर्यंत पारनेरच्या बाजार पेठेतुन ढोल, ताशे, लेजीम पथक व ढोलकी, डफ, तुणतुन्याच्या गजरात सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे.

संध्या.6 ते 7 या वेळेत सद्गुरू प्रतीमेचे पुजन होईल. संध्या 7 ते 8 या वेळेत उपस्थित भावीक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. रात्री 8 ते सकाळ पर्यंत महाराष्ट्रातुन आलेल्या नामवंत शाहीर मंडळांचा पारंपारीक कलगी तुर्‍याचा शाहीरी भेदीक भजणांचा कार्यक्रम होईल.

कार्यक्रमासाठी अहमदनगर, पुणे, कोल्हापूर सोलापूर आदी ठिकाणांहून नामांकित शाहीर व पारखपदी भक्तगण हजेरी लावत असतात. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन अविनाश पारख, बबन चौरे व निजामभाई शेख यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.