पारनेर तालुक्यातील जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात?

दिव्य मराठी अहमदनगर :- पारनेर तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. अंतर्गत मतभेद आणि मनभेद चव्हाट्यावर आले आहेत. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून झाली. आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तालुक्यातील जनता आता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद एवढा वाढला की, पक्षाध्यक्ष शरद पवार पारनेरला आले होते, तेव्हा मेळाव्यात सुजित झावरे यांनी जाहीर सभेत त्यांच्या कानावर ही बाब घातली. त्यावर पवार यांनी झावरे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीची तालुक्यात पीछेहाट झाली. त्याचा फायदा शिवसेनेला होईल, असे वाटत होते. मात्र, झाले वेगळेच. राष्ट्रवादीपेक्षाही शिवसेनेतील गटबाजी व अंतर्गत धुसफूस किती मोठी होती याचा अंदाज नुकताच आला. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेत काय झाले ते सर्वश्रूत आहे. 

सेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांना याच कारणाने पदावरून हटवण्यात आले, तरी हकालपट्टीसाठी खूप आधीपासून प्रयत्न सुरू होते. म्हणूनच लंके यांना या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेले. पक्षप्रमुख ठाकरे येण्याआधी लंके यांनी कार्यक्रमस्थळी येणे अपेक्षित होते, तरी लंके यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बरेच अडथळे पार करावे लागले.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांना एक वर्षाहून कमी कालावधी राहिला असल्याने तालुक्यातील या दोन प्रमुख पक्षात बंडाळी वाढत जाणार हे नक्की. नुकताच झालेला लंके यांचा वाढदिवस व त्याला जमलेला मोठा जनसमुदाय याची दखल तालुक्यातील प्रस्थापितांनी तर घेतलीच, पण जिल्हास्तरावरही चर्चा झाली. 

पारनेर तालुक्यातील कोणीही वजनदार राजकीय नेता व्यासपीठावर नव्हता. जे कोणी होते ते शिवसैनिक होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व ज्यांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही देणे-घेणे नाही, अशी सर्वसामान्य जनता तेथे आली होती.

महिना, सव्वा महिन्यातील तालुक्यातील ही तिसरी मोठी सभा. याआधी झालेल्या दोन राजकीय पक्षांच्या सभेला त्या त्या पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः उपस्थित होते, तरीही एवढी अफाट गर्दी जमली नव्हती, ती लंके यांच्या वाढदिवशी जमली!
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दोन्ही पक्षांतील तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, बाजार समिती सभापती व सर्व संचालक मंडळ, पक्षातील विविध पदाधिकारी व मातब्बर नेते पुढारी हे सर्वजण मिळून जेवढा जनसमुदाय आला होता, त्याहीपेक्षा लंके यांच्या कार्यक्रमाला कोणीही मातब्बर नसताना एवढा जनसमुदाय जमल्याने येणाऱ्या काळात तालुक्यात राजकीय परिवर्तन होणार का, अशा चर्चेला उधाण आले आहे. 

गर्दी राज ठाकरे यांच्या सभेलाही जमते, पण त्याचे मतात परिवर्तन होत नाही. हे जरी बरोबर असले, तरी लोक राज यांना पाहण्यासाठी व त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येतात. पण इथे नीलेश लंके लोकांना नवीन होते का? आणि असतीलही, पण त्यांचे वक्तृत्व किती हे सर्वांना माहीत आहे. 

मग ही गर्दी कशासाठी? ही परिवर्तनाची सुरुवात तर नाही ना? जनता आता घराणेशाहीला वैतागली आहे. नवीन नेतृत्वाचा हा उदय आहे का, हे येणाऱ्या काळात समजेलच, पण आज तरी याबाबत लोकांच्या मनातील विचारांना ऊत यायला सुरुवात झाली आहे.

नगर तालुक्यातून लंके यांना पाठबळ 
आगामी काळात आमदार विजय औटी, माजी जि. प. उपाध्यक्ष सुजित झावरे इतर सर्वच पक्षांतील प्रस्थापित नेत्यांच्या भूमिकेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष असेल. नीलेश लंकेंविरोधात आता कोणती खेळी करताे हे महत्त्वाचे असणार आहे. लंके यांच्या वाढदिवसाला नगर तालुक्यातील अनेक पुढाऱ्यांनी हजेरी लावल्याने नगर तालुक्यातून लंके यांना पाठबळ मिळत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

आमदार औटी यांना नेमके काय साधायचे होते? 
नीलेश लंके यांना तालुकाप्रमुख पदावरून हटवून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना नेमके काय साधायचे होते? अंतर्गत विरोध कमी करायचा होता की, लंके यांची तालुक्यातील संघटनात्मक वाढती ताकद व त्यामुळे विधानसभेला लंकेच प्रमुख अडसर होऊ शकतात हे ओळखून औटींकडून त्यांना डावलले जाऊ लागले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पारनेरमध्ये आणून त्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून शेवटपर्यंत दूर ठेवून लंके यांची पध्दतशीर अडचण करण्यात आली. नंतर लंके यांना पदावरून हटवण्यासाठी प्रयत्न केले गेले. पदावरून पायउतार होताच लंके यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे औटी सध्या बॅकफूटवर गेले हे मात्र नक्की! 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.